Menu

मनोरंजन
जिंकलस! मराठमोळ्या अमृता खानविलकरची कमाल, ‘नच बलिये’चं विजेतेपद पटकावलं

nobanner

 

नच बलिये या डान्स रिअॅलिटी शोच्या 7व्या सीझनचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा या जोडीनं विजेतेपद पटकावलं.

Nach Baliye 1

अमृता आणि हिमांशू ही जोडी स्पर्धेत सुरुवातीपासूनच चर्चेत होती. जबरदस्त परफॉर्मन्स देत या जोडीने आपला दबदबा कायम ठेवला होता. मात्र, इतर स्पर्धकही तेवढ्याच ताकदीचे होते. त्यामुळे अंतिम फेरीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती.

अखेर अमृता खानविलकर आणि हिमांश मल्होत्रा या जोडीनंच विजेतेपद मिळवलं. त्यांच्या नावाची घोषणा होताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. सचिन-सुप्रियानंतर नच बलियेमध्ये   कमाल करणारी अमृता ही दुसरी मराठी कलाकार ठरली आहे.