Menu

धर्म / आस्था
आज वसुबारस…आली दिवाळी

nobanner

वसुबारस ही दिवाळीची सुरुवात समजली जाते. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्यानं या दिवसाचं महत्व आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात.

घरांत लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरं, वासरं आहेत त्यांच्याकडे यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात.