Menu

जीवनशैली
नखे कुरतडण्याची सवय असेल तर हे जरुर वाचा

nobanner

अनेक लोकांना विचार करत असताना तसेच नुसते बसलेले असताना नख कुरतडण्याची सवय असते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की ही सवय तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे ते. या सवयीपासून सुटका मिळवण्यासाठी करा खालील उपाय

1.काही लोकांना सतत काही ना काही तोंडात टाकून चावण्याची सवय असते. जर तोंडात काही नसेल तर अशा व्यक्ती नखे चावण्यास सुरुवात करतात. मात्र ही सवय सोडायची असेल तर सतत तोंडात च्युईंग गम, दाणेफुटाणे, लॉलीपॉप तसेच गाजरसारखे पदार्थ तोंडात ठेवा.

2.जेव्हा नखे वाढतात तेव्हा आपसूकच कुरतडण्याची सवय पुन्हा सुरु होते. त्यामुळे नखे वाढूच देऊ नका. यामुळे या सवयीपासून सुटका होऊ शकेल.

3.ज्यांना ही सवय असेल तर एकाएकी ती बंद होणार नाही हळूहळू प्रयत्न करत राहा जेणेकरुन ही सवय पूर्ण बंद होईल.

4.नख कुरतडण्याची सवय असल्यास खराब चव असलेल्या नेलपेंटचा वापर करा. जेणेकरुन ही सवय सुटण्यास मदत होईल.

5.नेहमी पार्लरमध्ये जाऊन मेनिक्युअर करा. यामुळे तुमच्या नखांचे आरोग्य चांगले राहील. तसेच नेलआर्ट केल्यास नखे कुरतडली जाणार नाहीत.