Menu

मनोरंजन
‘अँग्री यंग मॅन’ विराट कोहलीचा ‘हा’ ट्रेलर पाहाच

nobanner

दशकभरापूर्वी क्रिकेटच्या मैदानावर इनिंग सुरू करणारा भारतीय कर्णधार विराट कोहली आता आणखी एक नवी इनिंग सुरू करतोय. होय, पत्नी अनुष्का शर्माप्रमाणे आता विराट कोहलीही अभिनय क्षेत्रामध्ये आपले नशीब अजमावणार आहे. विराट कोहलीने ट्विटरवर एक व्हिडीओ (ट्रेलर) पोस्ट केला.

गेल्या काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने याचा एक फोटो आणि टीझरही पोस्ट केला होता. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. विराट कोहलीची अॅड फिल्म २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली दमदार अॅक्शन करत असल्याचे पहायला मिळत आहे. हॉलिवूड सुपरहिरोप्रमाणे विराट अॅक्शन सिन्स करताना दिसून येतोय. सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे. या ट्रेलरमध्ये विराट कोहलीचा लूक ‘अँग्री यंग मॅन’ सारखा दिसतोय.

“Trailer: The Movie” असे टायटल असलेल्या हे ट्रेलरमध्ये विराट कोहलीने एखाद्या अॅक्शन हिरोप्रमाणे एन्ट्री घेतली आहे. “Trailer: The Movie” असं त्याच्या आगामी अॅड फिल्मचं नाव असून विराटच्या टी-शर्टवरही या प्रोडक्शन हाऊसचा लोगो दिसून येत आहे. यामध्ये विराट एका नव्या अंदाजात दिसत असून यापूर्वी रणवीर सिंह आणि रोहीत शेट्टी यांच्याही अॅड मुव्हीसाठीचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. पण त्यांच्यापेक्षा विराटची चर्चा चांगलीच रंगल्याचं दिसून येत आहे.