Menu

अपराध समाचार
एक्स- गर्लफ्रेंडला सायबर कॅफेत मारहाण, पोलिसाच्या मुलाची गुंडगिरी

nobanner

दिल्लीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाने एक्स- गर्लफ्रेंडला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्लीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोकसिंह तोमर यांचा मुलगा रोहित याने एका तरुणीला मारहाण केली होती. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रोहितच्या मित्रानेच हा व्हिडिओ शूट केला होता. या प्रकरणी रोहितवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती.

पोलिसांनी सुरुवातीला रोहितवर विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. रोहितने २ सप्टेंबर रोजी पीडित तरुणीला मित्राच्या सायबर कॅफेत बोलावले. तिथे रोहितने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडित तरुणीने त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करु असे सांगताच रोहित चिडला. त्याने पीडित तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी रोहितला अटक केली असून न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.