Menu

खेल
‘गंभीर’ विषयासाठी त्याने घेतलं ‘हे’ रुप

nobanner

परस्पर संमतीने दोन समलैंगिकांनी ठेवलेले संबंध म्हणजे गुन्हा नसल्याचं काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाकडून जाहीर करण्यात आलं. कलम ३७७ विषयीचा हा निर्णय ऐतिहासिक ठरला असून त्याचं सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आलं. मानवी हक्कांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा या निर्णयामुळे समाजाकडून बऱ्याचदा हीन वागणूक मिळणाऱ्या एलजीबीटीक्यू समुदायाला जणू सर्वांनी स्वीकारल्याचीच प्रतिक्रियाही अनेकांनी दिली.

अशा या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही आपली भूमिका एका वेगळ्या मार्गाने मांडली. विविध विषयांवर आपल्या ठाम भूमिका मांडणाऱ्या गौतमने तृतीयपंथीयांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून डोक्यावर पदर घेऊन, कपाळावर टिकली लावून महिलांचा वेश धारण करत सर्वांनाच थक्क केलं.

नवी दिल्ली येथे पार पडलेल्या हिजडा हब्बाच्या सातव्या पर्वाच्या अनावरणाच्या वेळी त्याने हजेरी लावली होती. त्याचवेळी त्याचं हे रुप पाहायला मिळालं. एचआयव्ही एड्स एलायन्स इंडियातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये ‘बॉर्न धीस वे’ अशी थीमही ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमात गंभीरने घेतलेली ही भूमिका आणि तृतीयपंथीयांच्या समर्थनार्थ त्याचं हे पाऊल सध्या सोशल मीडियावर अनेकांचच लक्ष वेधत असून त्याचीच सर्वाधिक चर्चा होत आहे.