Menu

मनोरंजन
किंग खानच्या वाढदिवसासाठी असा सजला ‘मन्नत’

nobanner

करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता साहरुख खानचा वाढदिवस म्हणजे संपूर्ण कलाविश्वासाठी एक सणच. प्रेक्षकाचं प्रेम आणि त्यामुळे असणारी एक वेगळीच श्रमंती नेमकी काय असते याचा अनुभव शाहरुखला आहे.

त्याची एक झलक पाहण्यासाठी, वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्यापर्यंत बहुधा न पोहोचणाऱ्या शुभेच्छा देण्यासाठी बराच लांबचा प्रवास तरुन चाहते थेट त्याच्या मन्नत या बंगल्यापाशी येऊन उभे असतात.

ही जणूकाही एक प्रथाच आहे, असं समजणाऱ्या त्याच्या चाहत्यांचा आकडाही तुलनेने जास्त आहे.

प्रेक्षकाचं अमाप प्रेम मिळवणाऱ्या या अभिनेत्याच्या घरी सध्या तयाली सुरु आहे ती म्हणजे त्याच्या वाढदिवसाची.

२ नोव्हेंबरला शाहरुखचा वाढदिवस असल्यामुळे आणि त्यानंतरच अवघ्या काहगी दिवसांवर दिवाळीच्या मंगलपर्वाची सुरुवात होत असल्यामुळे त्याच्या बंगल्यावर सुरेख अशी रोषणाई करण्यात आली आहे.

सोशल मीडियाचा आधार घेत अनेक फॅनपेजवरुन किंग खानच्या बंगल्याचे सुरेख फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

दरवर्षी शाहरुख त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अलिबागच्या त्याच्या फार्महाऊसवर जंगी पार्टीचं आयोजन करतो. पण, यंदा मात्र आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याच्या निमित्ताने तो मन्नतमध्येच एका खास कार्यक्रमाचं आयोजन करु शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.


Fatal error: Allowed memory size of 268435456 bytes exhausted (tried to allocate 84 bytes) in /home/awaazha7/public_html/wp-includes/taxonomy.php on line 2881