Menu

मनोरंजन
‘तानाजी’ चित्रपटात बी टाऊनचा ‘हा’ खान साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका?

nobanner

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहिण्याबोलण्यासाठी शब्दही अपूरे पडतील असंच म्हणावं लागेल. अविश्वसनीय पराक्रम करत शत्रूला स्वराज्यातून पळ काढण्यास भाग पाडणाऱ्या महाराजांच्या अनेक शूर गाथा आजवर आपण ऐकल्या, पाहिल्या आहेत. रुपेरी पडद्यावरही त्यांना विशेष स्थान देण्यात आलं आहे. त्यातच आता पुढचं पाऊन म्हणून महारहाजांच्या गाथेसोबतच त्यांच्या मावळ्यांच्याही पराक्रमांची झलक रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे.

अभिनेता अजय देवगण हा त्याच्या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट साकारणार असून, काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणासही सुरुवात झाली.

अनेकांचच लक्ष लागून राहिलेल्या या महत्त्वाकंक्षी चित्रपटाशी निगडीत आणखी एक वृत्त सध्या चर्चेत आहे. ते म्हणजे यातील महाराजांच्या भूमिकेविषयीचं.

एक वेगळाच मान आणि उत्तुंग पराक्रम असणाऱ्या शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सैफ अली खान साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे.

खुद्द अजय या चित्रपटात नरवीर तानाजी मालुसरे यांची व्यक्तीरेखा साकारेल हे आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. ज्यानंतर सैफला शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासंबंधीची विचारणा करण्यात आली.

सैफने अद्यापही याविषयी कोणतंच उत्तर दिलेलं नसल्यामुळे आता तो ही भूमिका साकारण्याची जबाबदारी घेणार का, हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.