Menu

देश
दादर फुल मार्केटमध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू

nobanner

दादर फुल मार्केटमध्ये गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केला असून मृत व्यक्तीचं नाव मनोज मौर्या (35) असल्याचं समजत आहे. हल्लेखोर दुचाकीवरुन आले होते. मनोज मौर्या यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहे. दादर फुल मार्केट गजबजलेला परिसर असून अशा ठिकाणी दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. हल्लेखोरांनी मागून केलेल्या गोळीबारात मनोज मौर्य यांचा जागीच मृत्यू झाला. मनोज मौर्य फुल मार्केटमध्ये वजनकाठा पुरवण्याचं काम करत होते. गोळीबाराचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून अंतर्गत वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी गोळीबार झालेला परिसर सील केला असून सध्या तपास सुरु आहे.

मनोज मौर्या यांचा मृतदेह केईएम रुग्णालयान नेण्यात आला असून शवविच्छेदन केले जात आहे.