Menu

देश
दिल्लीवरून हिरवा कंदिल आणि फडणवीस सरकारचा खांदेपालट

nobanner

राज्य मंत्रीमंडळाचा खांदेपालट लवकरच होणार आहे. मंत्रीपदावरुन डच्चू मिळणाऱ्या आणि मंत्रीपदी नव्यानं वर्णी लागणाऱ्यांच्या नावांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. यादी मंजूर झाली की मंत्रीमंडळ विस्ताराला हिरवा कंदिल मिळणार आहे.

यामध्ये शिवसेनेचे मंत्री दीपक सावंत मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एखादं जास्तीच खातं शिवसेनेला यंदा मिळू शकतं.

मात्र, यामुळे शिवसेनेतल्या इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. त्याचा दसरा मेळाव्यावर परिणाम होऊ शकतो.