Menu

देश
पुण्याच्या एफटीआयआयमध्ये लैंगिक शोषण, विद्यार्थिनीचं पत्र

nobanner

पुण्यातील फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्येही लैंगिक शोषणाचा प्रकार पुढे आला आहे. संस्थेतील एका विद्यार्थिनीनं थेट माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून तक्रार केली आहे.

संस्थेतील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या बाबतीत लैंगिक शोषणाची वारंवार तक्रार करुनही एफटीआयआयचे संचालक आणि एफटीआय प्रशासनानं लक्ष दिलं नसल्याचा आरोप या विद्यार्थिनीनं आपल्या तक्रारीत केला आहे.

तसंच तक्रार केल्यानंतर आपल्या कामात अडथळे आणण्यात आल्याचा आरोपही विद्यार्थिनीने केला आहे. तर संचालकांनी विद्यार्थिनीचे आरोप फेटाळले आहेत. संबंधित विद्यार्थिनीच्या शैक्षणिक तक्रारीमुळे तिची शिष्यवृत्ती नाकारल्याचं स्पष्ट केलं आहे.