Menu

अपराध समाचार
वाढदिवशी आई-बाबांकडूनच गळा दाबून मुलीची हत्या

nobanner

मालेगावमध्ये झालेल्या नेहा चौधरीच्या मृत्यूनं वेगळं वळण घेतलंय. नेहाची तिच्याच आईवडिलांनी हत्या केल्याचं उघड झालंय. नेहाची तिच्या वाढदिवशीच गळा दाबून हत्या करण्यात आलीय. प्रेमसंबंधांतून तिची हत्या करण्यात आल्याचं उघड झालंय. जन्मदात्यांनीच चुलत भावाच्या मदतीनं नेहाची गळा दाबून हत्या करण्यात आली.

नाट्यमय घडामोडी

मात्र हा सर्व प्रकार उघड होण्यापूर्वी नाट्यमय घडामोडी घडल्या. नेहावर  अंत्यसंस्कार करण्यासाठी तिचा मृतदेह चितेवर ठेवलेला होता. मात्र पोलिसांनी अमरधाममध्ये अचानक धडक देत तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. कारण एका निवानी फोन कॉलवरून पोलिसांना तिच्या संशयास्पद मृत्यूची माहिती मिळाली होती.

गुन्हा दाखला

त्यानंतर पोलिसांनी तातडीनं सूत्रं हलवत वेळीच नेहाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी नेहाचे आई-वडील आणि तिच्या चुलत भावाला अटक केली असून पोलिसांत गुन्हाही दाखल केलाय.