Menu

अपराध समाचार
शास्त्रज्ञ भास्करदत्त यांच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला उरणच्या खाडीत

nobanner

बीएआरसीचे शास्त्रज्ञ भास्करदत्त गोरटी यांचा बेपत्ता मुलगा नमन गोरटी याचा मृतदेह उरण खाडीत सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून नमन गोरटी बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. २३ तारखेला रात्री १० वाजता भास्कर दाम्पत्य झोपलं होतं. त्यावेळी रात्री रात्री साडेदहा वाजता नमन न सांगता घराबाहेर पडला तो परतलाच नाही. रात्री १० वाजून ५४ मिनिटांनी त्याने वाशीहून सीएसटीला जाणारी ट्रेन पकडली. मागील १२ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याचा मृतदेह उरणच्या खाडीत आढळला आहे.

वाशी ते सीएसटीपर्यंतच्या सगळ्या स्थानकांवरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. मात्र नमन त्यांना सापडू शकला नाही. नमन स्वतःहून घर सोडून गेला होता. त्याच्यावर अभ्यासाचा ताण होता असे पोलिसांनी म्हटले आहे. तरूण मुलाला अकाली गमावल्याने भास्कर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेले ११ ते १२ दिवस पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र नमनचा मृतदेह सापडल्याने आता त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याचा तपास वाशी पोलीस घेत आहेत.

न सांगता घर सोडून जाण्याची नमनची ही पहिली वेळ नव्हती. अभ्यासाचा ताण आल्याने तो मानसिकरित्या खचला होता. तो नेहमी डिप्रेशनमध्ये असायचा. त्याच्यावर उपचारही सुरु होते. तरीही अशी घटना का घडली असावी याचा शोध आता पोलीस घेत आहेत.