Menu

देश
शिर्डीत भाविकांकडून पोलीसच पैसे घेत असल्याची गृहराज्यमंत्र्यांची कबुली

nobanner

शिर्डीमध्ये वाढत्या गुन्हेगारीसोबत भाविकांच्या वाहनांकडून पोलीस पैसे घेत असल्याचं खुद्द गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मान्य केलंय. लूट करणा-या पोलिसांवर कारवाई करत बदली करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलीय.

तसंच शिर्डीतील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. झी २४ तासच्या रोखठोक चर्चेत या विषयावर झालेल्या चर्चेनंतर गंभीर दखल घेत आता पावलं उचलण्यात येतायत.

साईंची काकड आरती

शिर्डीत आज विजयादशमी आणि साई समाधी शताब्दी सोहळा मोठ्या थाटात पर पडतोय.

हा सोहळा पाहण्यासाठी आणि बाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मेठी गर्दी केलीय. पहाटे शेकडो भाविकांच्या उपस्थितीत साईंची काकड आरती करण्यात आली.