Menu

देश
शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या वेळी मान्यवरांची बोट बुडाली

nobanner

शिवस्मारकाच्या शुभारंभासाठी गेट वे ऑफ इंडियावरून निघालेली एक बोट कुलाबा लाईट हाऊसजवळ खडकावर आपटल्याने या बोटीत पाणी शिरल्याने ही बुडाल्याची महिती येत आहे. या बोटीमध्ये एकूण 25 जण होते. त्यापैकी 2 जण बुडाल्याची माहिती समोर येत आहे. 3 पैकी 2 बोट सुरक्षित असून एक बोट खडकाला धडकल्याने अपघात झाला आहे.

बोटीमध्ये कोणताही जीवरक्षक नसल्याचं देखील आता कळतं आहे. या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. जी बोट बुडाली त्या बोटीत मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकारी होते. ही बोट राज्य सरकारच्या मालकीची आहे. दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास ही बोट बुडाल्याची माहिती आहे.

अरबी समुद्रात इंजिन नादुरुस्त होऊन बोट बुडत असताना त्या बोटीतून प्रवास करणाऱ्यांना वाचविण्यात पोलिसांना यश आलं आहे. दुसरी बोट १५ मिनीटांमध्ये घटनास्थळी पाठवून पोलिसांनी बुडणाऱ्या बोटीतील प्रवाशांची सुटका केली.

जी बोट बुडाली त्यातून काही पत्रकारांना जाण्याची विनंती सरकारी अधिकारी करत होते. मात्र बोटीत जास्त गर्दी झाल्याने पत्रकारांनी त्या बोटीत जाण्यास नकार दिला.