Menu

अपराध समाचार
सुटकेसमध्ये आढळला मॉडेलचा मृतदेह, चार तासांत आरोपी गजाआड

nobanner

मुंबईतील मालाड येथे एका 20- 22 वर्षीय मॉडेलचा मृतदेह आढळल्यामुळे सध्या परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. एका सुटकेसमध्ये या मॉडेलचा मृतदेह आढळून आला.

मानसी दीक्षित असं त्या मॉडेलचं नाव आहे. हातपाय बांधून आणि गळा आवळून तिचा मृतदेह बॅगमध्ये भरण्यात आला होता. पोलीस आणि फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने तपास करत अवघ्या चार तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सय्यद मुजम्मील इब्राहीम असं आरोपीचं नाव आहे. हत्या आणि पुरावे नष्ट करण्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीने मानसीला भेटण्यासाठी अंधेरी येथे बोलावलं होतं. त्यांच्यात काही कारणाने भांडण झालं, हाणामारीही झाली. ज्यानंतर आरोपीने मानसीची हत्या करत तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन मालाडच्या बॅकबेवरुन फेकून दिला.

सदर प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीचा अवघ्या चार तासांमध्ये शोध घेतला.