Menu

देश
हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

nobanner

हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला आणि मारहाणीला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शिरूर तालुक्यात वडनेर गावात घडली आहे. सुरेखा पवार असं या विवाहितेचं नाव आहे.

हुंड्यासाठी पती आणि सासू सासरे सुरेखा यांना जबर मारहाण करत असत. मारहाणीत सुरेखा यांच्या मेंदूला आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. सुरेखा पवार यांना दीड वर्षांचा मुलगाही आहे.

लग्न झाल्यापासून सुरेखा यांना सासरची मंडळी सतत मारहाण करत होती. या प्रकरणी आरोपी पती, सासू सासरे, दोन दीर अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.