Menu

देश
अवनीचे बछडेही नरभक्षक होण्याच्या मार्गावर-शआफत अली

nobanner

अवनी या (टी१) वाघिणीचे बछडेही नरभक्षक होण्याच्या मार्गावर आहेत असा दावा शआफत अली या शिकाऱ्याने केला आहे. वाघीण जेव्हा माणसांना मारायची तेव्हा तिचे बछडेही तिच्यासोबत असायचे. अवनी वाघिणीची शिकार झाल्यानंतर आता हा धक्कादायक दावा शूटर शआफत अलीने केला आहे. माणसांना जेव्हा वाघीण मारायची तेव्हा तिचे दोन बछडे तिच्यासोबत होते त्यामुळे माणसाकडेही ते शिकार म्हणून पाहू शकतात आणि ते भविष्यात शिकार करू शकतात असाही अंदाज व्यक्त होतो आहे. शिकार करणे बछडे आईकडूनच शिकत असतात. वाघीण जेव्हा हरीण, म्हैस, डुक्कर यांची शिकार करते तेव्हा हे आपले अन्न आहे आपली शिकार आहे हे बछड्यांना समजते. आता माणूस मारतानाही हे बछडे त्यांच्या आईसोबत होते त्यामुळे माणूस हादेखील शिकारच आहे अशी या बछड्यांची मानसिकता होऊ शकते असे शआफत अलीने म्हटले आहे.

शआफत अलीने काय म्हटले आहे?
अवनी या वाघिणीचे बछडे सध्या १० ते ११ महिन्यांचे आहेत.
शिकारीची मानसिकता याच वयात घडत असते
सगळे बछडे आईकडूनच शिकार करणे शिकतात.
अवनी वाघिणीने जेव्हा माणसांना मारले तेव्हा बछडे तिच्यासोबत होते
माणसांच्या मृतदेहांवर बछड्यांची लाळ आढळली आहे
भविष्यात हे बछडेही नरभक्षक होऊ शकतात

अवनी या वाघिणीच्या शिकारीवरून चांगलेच राजकारण सुरु असतानात आता शार्पशूटरने धक्कादायक असा दावा केला आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी शिकार प्रकरणात लक्ष घालत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. तसेच अनेक वन्यप्रेमी संघटनाही वाघिणीला चुकीच्या पद्धतीने मारल्याचे म्हणत आहेत. विरोधी पक्षांनी तर अंबानींच्या प्रकल्पामुळेच वाघिणीला ठार केल्याचा आरोप केला आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाघिणीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार कसे केले असा प्रश्न उपस्थित केला आहे. हे सगळे आरोप प्रत्यारोप होत असताना शार्प शूटरने केलेला दावा नक्कीच धक्कादायक आहे. शिकार झाल्याच्या दिवसापासून सरकारवर टीका होताना दिसते आहे.