Menu

देश
बाईकला कट मारली म्हणून उल्हासनगरमध्ये तरुणाची हत्या

nobanner

क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना ठाण्यातील उल्हासनगरमध्ये घडली आहे. बाईकला कट मारल्याच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. नवीन चौधरी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उल्हासनगरमधील कॅम्प ३ परिसरातील सम्राट अशोक नगरमध्ये मध्यरात्री ही घटना घडली. नवीन चौधरी हा शिवसेना उपविभाग प्रमुख दशरथ चौधरी यांचा पुतण्या होता. नवीनची हत्या केल्यानंतर गुंडांनी परिसरात तलवारी घेऊन गोंधळ घातला आणि गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. तर, तक्रार करुनही पोलिसांनी तातडीने घटनेची दखल घेतली नाही असा आरोप स्थानिकांनी केला आहे.