Menu

देश
समाविष्ट गावांतील रस्ते अरुंदच!

nobanner

भूसंपादनापोटी सहा हजार ६५० कोटी रुपये खर्च अपेक्षित

रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव पुन्हा नव्याने आल्यानंतर प्रशासनाकडून त्या बाबत अभिप्राय सादर करण्यात आला आहे. समाविष्ट गावातील रस्ता रुंदीकरणासाठी २३ लाख १९ हजार ७२० चौरस मीटर क्षेत्र संपादित करावे लागणार आहे. त्याला ६ हजार ६५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रतिचौरस मीटर ३ हजार ४५९ रुपये या दराने प्रत्यक्ष रस्ते विकसित करण्यासाठी ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. भूसंपादन आणि प्रत्यक्ष रस्ता विकसनाची ही रक्कम ७ हजार ५०० कोटीपर्यंत जात आहे. यापैकी अविकसित असलेल्या रस्त्यांच्या भूसंपादनाचा खर्च ५ हजार २०० कोटी रुपये असून, हस्तांतरणीय विकास हक्क (ट्रान्सफरेबल डेव्हलमेंट राईम्ट्स- टीडीआर) आणि चटई क्षेत्र निर्देशांकाच्या (प्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसआय) माध्यमातून भूसंपादन करायचे झाल्यास मोठय़ा प्रमाणावर टीडीआर आणि एफएसआयची खैरात करावी लागणार आहे.