Menu

अपराध समाचार
हिरे व्यापारी उदानी हत्या प्रकरणात आणखी तिघांना अटक

nobanner

हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हत्या प्रकरणात पंतनगर पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली आहे. महेश प्रभाकर भोईर, निखत ऊर्फ झारा मोहम्मद, सायीस्ता सरवर खान ऊर्फ डॉली या तिघांना पंतनगर पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतात का, याची चर्चा सुरु झालेय.

दरम्यान, या प्रकरणात झाराला, तुला एखादा चांगला रोल मिळवून देतो असे सचिन पवार आणि दिनेश पवार यांनी सांगून उदानीला तिची ओळख एक मॉडेल आहे, अशी करून दिली होती. ज्या वेळेला उदानीची हत्या करण्यात आली त्यावेळी ती तेथे उपस्थित होती, अशी माहिती पुढे आलेय. महेश भोईर आणि सायन्स ताक खान हे दोघे देखील या कटात सामील असल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान या दोघांनी नेमकी कोणती भूमिका बजावली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.