Menu

मनोरंजन
‘काम मिळवण्यासाठी सारानं अक्षरश: माझ्यापुढे हात जोडले!’

nobanner

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खाननं ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात सारानं साकारलेल्या भूमिकेचं खूपच कौतुक झालं. रणवीर सिंगसोबतचा तिचा दुसरा चित्रपट ‘सिम्बा’ही नुकताच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे ‘केदारनाथ’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तिच्या वाट्याला ‘सिम्बा’ आला . या चित्रपटात प्रमुख भूमिका मिळावी यासाठी सारानं अक्षरश: रोहित शेट्टीकडे हात जोडून काम मागितलं होतं.

‘कॉमेडी नाईट्’स विथ कपिलच्या पहिल्या भागात सारा अली खान रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. यावेळी रोहित शेट्टीनं साराची निवड कशी झाली याचा भन्नाट किस्सा सांगितला. काम मिळवण्यासाठी सारानं मला खूप मेसेज केले होते. शेवटी कंटाळून मी तिला भेटायला बोलावलं. साराच्या घरातील प्रत्येक व्यक्ती सेलिब्रिटी आहेत. ती स्टार किड आहे त्यामुळे भेटायला येताना चार पाच बॉडीगार्ड, मॅनेजर असा लवाजमा घेऊन ती येईल असं मला वाटलं. मात्र ती एकटीच आली होती. ती एकटीच आली यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मला भेटायला आल्यावर अक्षरश: हात जोडून तिनं काम मागितलं.

तिचा तो सच्चपणा मला एवढा भावला की माझे डोळे पाणावले. सैफ अली खानची मुलगी असतानाही काम मिळवण्यासाठी ती करत असलेली धडपड मला खूप आवडली. तिला चित्रपटात काम द्या असं सांगायला मला ना सैफनं फोन केला ना अमृता सिंगनं. तिनं काम मिळवण्यासाठी स्वत: धडपड केली हे मला खूप जास्त आवडलं असं म्हणत रोहितनं तो किस्सा सांगितला.