Menu

देश
झेल पकडताना त्याचा अंदाज चुकला अन्…

nobanner

बिग बॅश लीग म्हणजे चौकार आणि षटकारांची स्पर्धा. ही स्पर्धा कायम मोठमोठ्या आणि उत्तुंग फटाक्यांसाठी चर्चेत असते. पण ही स्पर्धा आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. २०१८ च्या IPL हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळलेला बेन कटिंग याला या स्पर्धेत दुखापत झाली. फलंदाजाने उंच टोलवलेला चेंडू झेलताना त्याला गंभीर दुखापत झाली. तो चेंडू थेट त्याच्या कपाळावर आदळला आणि तो रक्तबंबाळ झाला.

मेलबर्न आणि ब्रिस्बेन या दोन संघांमध्ये सामना सुरु होता. मेलबर्नच्या संघाची फलंदाजी सुरु असताना ही घटना घडली. मेलबर्नचा संघ १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. त्यावेळी पहिल्याच षटकात पॅटिन्सनने टाकलेल्या चेंडूवर मार्कस हॅरिस याने उंच फटका मारला. तो झेल टिपताना चेंडू कटिंगच्या कपाळावर दोन भुवयांच्या मधोमध बसला. त्यानंतर त्याच्या जखमेतून रक्त वाहू लागले.

दरम्यान, या सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत बेन कटिंगने आपण तंदुरुस्त असल्याचे सांगितले. मला दुखापत झाली असली, तरी ती फारशी गंभीर वाटत नाही. कारण त्यानंतर मला डोकेदुखीचा त्रास झालेला नाही. मी पुढील सामन्यात खेळण्यासाठी सज्ज आहे.