Menu

देश
देश नव्या विश्वासाने भाजपाकडे पाहत आहे – नरेंद्र मोदी

nobanner

पुढचे पाच महिने फक्त निवडणुकीचे आहेत. आपण जो प्रत्येक लेख वाचू, न्यूज बघू त्यावेळी कसे जिंकायचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेवर पुन्हा कसे आणायचे ही एकच गोष्ट लक्षात असली पाहिजे असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले. ते दिल्लीत रामलीला मैदानावर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीमध्ये बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे

– देश नव्या विश्वासाने भाजपाकडे पाहत आहे.
– सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही.
– आपल्या आधीच्या सरकारने देशाला अंधारात ढकलले.
– २००४ ते २०१४ ही दहावर्ष देशाने भ्रष्टाचार, घोटाळयामध्ये गेली.
– सरदार वल्लभभाई पटेल पहिले पंतप्रधान बनले असते तर देशाचे चित्र वेगळे असते.
– २००४ च्या निवडणुकीत अटलजी पंतप्रधानपदी कायम राहिले असते तर भारत आणखी उंचीवर गेला असता.
– देश प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालत आहे

– मला आज जास्त वेळ बोलायचे आहे.

– भारताला आपले लक्ष्य गाठायचे आहे.
– दोन खासदार असलेल्या पक्षाचे आज विशालस्वरुप झाले आहे.
– देशातील १६ राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे.