Menu

दुनिया
पैशांचा डोंगर, कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला ३१३ कोटींचा बोनस

nobanner

टार्गेट पूर्ण न केल्याबद्दल कर्मचाऱ्यांना रस्त्यावर रांगण्याची अमानुष शिक्षा, प्रेम करण्यासाठी सुट्टी अशामुळे चीनमधील काही कंपन्या गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेचा विषय होत्या. आता चीनमधील आणखी कंपनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या भरभक्कम बोनसमुळे चर्चेत आहे. चीनमधील एका नामांकित कंपनीने स्प्रिंग फेस्टिवलचे निमित्त साधत (चायनिज नववर्ष) कर्मचाऱ्यांना तब्बल ३१३ कोटी रूपयांचा बोनस दिला आहे. पण हा बोनस देताना कंपीने भन्नाट कल्पना वापरली आहे. कंपनीचा हा मोठेपणा पाहून कर्मचारी अवाक झाले होते.

सर्वप्रथम कंपनीने ऑफिसमध्ये पैशांचा डोंगर उभा केला. त्यासाठी तब्बल ३१३ कोटी रूपये लागले. त्यानंतर सर्व पैशे कर्मचाऱ्यांमध्ये बोनस म्हणून वाटले. या कंपनीमध्ये तब्बल पाच हजार कर्मचारी काम करतात. सरासरी प्रत्येकी ६२ लाख रूपयांचा बोनस प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळाला. रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांना मिळालेला हा बोनस गतवर्षापेक्षा दुप्पट आहे.

चीनमधील जियांग्शी प्रांतात असलेल्या एका स्टील कंपनी हा कारनामा केला आहे. या कंपनीने ३०० मिलियन युआन (चिनी रुपये)चे ‘कॅश माउटेंन’तयार केला होता. सोशल मीडियावर या पैशाच्या डोंगराचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.