Menu

अपराध समाचार
मांत्रिकाकडून आजारी पतीच्या उपचारासाठी आलेल्या पत्नीवर बलात्कार

nobanner

पुण्यात एका मांत्रिकाने विवाहीतेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याशिवाय या मांत्रिकाने पीडित महिलेची 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याचंही समोर आलं आहे. पुण्यातील येरवडामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी पोलिसांनी मांत्रिकाला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या आजारी पतीवर उपचारासाठी आरोपी मांत्रिकाकडे गेली होती. पुणे स्टेशन येथे या महिलेची शब्बीर युनुस शेख(वय 45,रा.कोंढवा सध्या रा.लक्ष्मीनगर येरवडा) नावाच्या मांत्रिकाशी ओळख झाली. त्यानंतर तिने त्या मांत्रिकाला पतीच्या आजाराबाबत माहिती दिली. त्यावर त्याने त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी काही मंत्रउपचार करण्यास सांगितले. ती महिला पतीला उपचारासाठी त्याच्या घरी घेऊन गेली. त्याने तिच्या पतीवरुन लिंबु कापुर यांचा उतारा टाकून त्याच्या अंगात भुतबाधा झाली असल्याचं सांगितलं, त्यानंतर त्या महिलेला पाण्यात गुंगीचे पेय देय देऊन बेशुद्ध करुन बलात्कार केला. आणि याबाबत कुणाला सांगितल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय या मांत्रिकाने उपचाराच्या नावाखाली महिलेकडून 3 लाख रुपयेदेखील उकळले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान, येरवडा पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन मांत्रिकाला अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.पानसरे यांनी आरोपीला 13 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.