Menu

देश
रत्नागिरीत सापडला महाकाय मासा, फोटो पाहून व्हाल हैरान

nobanner

रत्नागिरीतील मिरकरवाड्यातील मच्छिमारांच्या जाळात एक महाकाय मासा अडकला. या महाकाय माशाची चर्चा जोरदार आहे. या माशाळ्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी चक्क क्रेनचा आधार घ्यावा लागला. समुद्रातून या महाकाय माशाला बाहेर काढले त्यावेळी त्याचे वजन केले असता ५०० ते ६०० किलो झाले. ही घटना आहे सोमवार ७ जानेवारीची. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील हर्णै येथील मच्छिमारांच्या जाळयात मोठा मासा सापडला होता. आता अशीच घटना रत्नागिरीत घडलेय. मिरकरवाडा बंदरातील मच्छिमारांचे जाळ्यात भले मोठे वागली (वाटू) मासे जाळ्यात सापडलेत. सुमारे ५०० ते ६०० किलो वजनाचा हा मासा उचलण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. या माशांची किंमत हजारो रुपयांच्या घरात आहे.

राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. याचा परिणाम हा मासेमारीवरही दिसून येत आहे. मच्छिमारीसाठी वातावरणातील बदलही महत्वाचे ठरत आहेत. थंड हवामान काळात मोठे मासे उथळ पाण्याकडे येतात. त्याचा अनुभव आला सापडलेल्या या महाकाय माशातून आला. मिरकरवाडा येथील मच्छिमार रऊफ साखरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मच्छिमारी नौका मासेमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या. त्यावेळी जाळ्यात अवजड मासे लागल्याचे नौकेवरील खलाशांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पाहणी केल्यानंतर महाकाय मासा दिसून आला.

मासे पाहण्यासाठी मोठी गर्दी

मच्छिमारांनी जाळे नौकेवर ओढताच चार भले मोठे वागळी (वाटू) मासे अडकल्याचे पाहून सारेच चकीत झाले. हे मासे जाळ्यातून बाहेर काढताना खलाशांना मोठी कसरत करावी लागली. ५०० ते ६०० किलो वजनाच्या माशांना बाहेर काढण्यासाठी क्रेनचा आधार घ्यावा लागला. मिरकरवाडा जेटीवर हे मासे नौकेवरून उतरवताच ते पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

माशांची किंमत ८० हजार रुपयांच्या घरात

त्यानंतर क्रेनद्वारे लगतच्या फॅक्टरीमध्ये नेऊन त्याचे वजन करण्यात आले. साधारणपणे ५० ते ८० किलो वजन भरणारे हे मासे ५०० ते ६०० किलो इतक्या वजनाचे सापडल्याने मच्छिमारांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. एका माशाची किंमत १५ ते २० हजार रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे या चार माशांची किंमत ८० हजार रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.