Menu

देश
लिप सर्जरीमुळे सारा खान ट्रोल

nobanner

सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे सेलेब्स कायम ट्रोल होतच असतात. मात्र, आता टीव्हीतील लोकप्रिय चेहरा अभिनेत्री सारा खान एका वेगळ्या कारणामुळे ट्रोल झाली आहे. स्वतः काहीतरी वेगळं असण्याच्या नादात सारा खान सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.

साराने आपल्या ओठांची सर्जरी करून घेतली आणि याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. बस्स… झालं सारा खान आता या कारणामुळे ट्रोल झाली आहे.

फोटो शेअर करताना ट्रोलर्सने साराच्या ओठांवर खूप घाणेरडे कमेंट्स केले आहे. या नकारात्मक कमेंट्सवर साराने आतापर्यंत कोणतंच उत्तर दिलेलं नाही. साराने सोशल मीडियावर ‘बिदाई’ या मालिकेतून वापसी करत आहे. याकरता तिने हे फोटो शेअर केले आहेत.

सारा चाहत्यांना सरप्राईदज देणार होती पण यातून काहीतरी वेगळंच झालं. यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे. पण काय हालत झाली सारा खानची.

सारा खान कायमच आपल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे वादात अडकतेच. नुकताच तिचा ब्लॅक हार्ट हे गाणं आलं होतं ज्यामध्ये ती सेमी न्यूड झाल्यामुळे वादात अडकली होती. सारा तिच्या कामांमुळे नाही तर सोशल मीडियावर वादांमुळे खूप वेळा चर्चेत आली आहे. आपले फोटो शेअर केल्यामुळे कायमच तिचे चर्चा होत असते. काही दिवसांपूर्वी तिने आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

या अगोदर तिने पाकिस्तानी जाहिरात केली होती. त्यावेळी देखील सारा खूप ट्रोल झाली होती. साराने आपल्या इंस्टावर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये तिने लिहिलं होतं की, ‘माझं पाकिस्तानी कर्मशिअल’ #faizabeautycream यावरून सारा खूप ट्रोल झाली होती.