Menu

खेल
सचिनला २ गुण हवेत, मला तर वर्ल्ड कप हवाय – गांगुली

nobanner

World Cup 2019 स्पर्धा ३० मे पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत १६ जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. मात्र पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानशी सामना खेळू नये, असा सूर सर्वत्र उमटत आहे. याबाबत बोलताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सामना रद्द करून पाकला २ फुकटचे गुण का द्यायचे? असा सवाल उपस्थित केला होता. यावर सचिनला केवळ २ गुण हवेत, पण मला विश्वचषक भारताने जिंकायला हवा आहे, असे मत माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केला आहे.

World Cup 2019 स्पर्धेत १० संघ सहभागी होत आहेत. प्रत्येक संघाला एकमेकांविरुद्ध खेळायचे आहे. जर भारताने १ सामना खेळला नाही तर, खूप मोठा फरक पडणार नाही. पण विश्वचषक स्पर्धेबाबत बोलायचे झाले, तर सचिनला केवळ पाकिस्तानविरुद्धचे २ गुण गमावू द्यायचे नाहीत; मला मात्र भारताने विश्वचषक जिंकावा असं वाटत आहे, असे तो म्हणाला.

विराटने केलेल्या वक्तव्याबाबतही त्याने मत व्यक्त केले. ‘सरकार आणि BCCI जो निर्णय घेईल, तो निर्णय आम्हाला मेनी असेल हे विराटाचे म्हणणे मला पूर्णपणे मान्य आहे. भारत विरुद्ध पाक सामन्यात कायमच दडपण असते, त्यामुळे त्याने फक्त खेळावर लक्ष ठेवावे. बाकीचे निर्णय सरकार आणि BCCI घेईलच, असे गांगुली म्हणाला.

दरम्यान, गांगुलीच्या वक्तव्यावर जावेद मियाँदाद याने हा ‘पब्लिक स्टंट’ म्हणत गांगुली राजकारणातील ‘इंनिग’ची तयारी करत असल्याचे म्हटले होते. यावर गांगुलीने कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. मी मियाँदादच्या फलंदाजीचा आनंद घेतला आई मी त्याचा अजूनही चाहता आहे, असे गांगुली म्हणाला.