Menu

अपराध समाचार
बीडमध्ये ट्रक-इर्टिगाचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

nobanner

अहमदनगर-जामखेड रोडवर ट्रक-इर्टिगामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहे. जखमीवर जवळील रूग्णालयाध्ये उपचार सुरू आहे.

अहमदनगर-जामखेड रोडवर पोखरी फाटा येथे ट्रक आणि इर्टिगा गाडीची समोरासमोर धडक झाल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये दोन पुरुष एका महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

आज रविवारी पहाटे चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघात मृत्यू झालेले सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत. सर्वजण नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सावरगाव पिरजादे येथील रहिवाशी आहेत.