Menu

अपराध समाचार
मोखाडा घाटातील दरीत बस कोसळली; ६ ठार, ४५ जण जखमी

nobanner

शिर्डी दर्शन करून डहाणूकडे जात असलेल्या बसला नाशिक-जव्हारा रस्त्यावर अपघात झाला. मोखाडा घाटातील दरीत बस कोसळून ६ ठार तर ४५ जण जखमी झाले. ही घटना आज (रविवार) दुपारच्या सुमारास घडली. बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला असावा अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. बस दरीत कोसळल्यानंतर त्वरीत मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल केले आहे. जखमी व मृत हे गुजरातमधील असल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी पोलीस व बचाव पथकाने त्वरीत धाव घेतली. अपघाताबाबत अधिक माहिती समजू शकलेली नाही.