Menu

अपराध समाचार
राजस्थानमध्ये मिग-२१ विमान कोसळले, वैमानिक सुखरुप

nobanner

राजस्थानच्या बिकानेरमध्ये शोभा सार की धानी भागात शुक्रवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे मिग-२१ बायसन विमान कोसळले. सुदैवाने वैमानिक या अपघातातून बचावला. नाल येथून मिग-२१ बायसन विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण केले होते.

उड्डाणानंतर काही वेळातच इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. या अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यात येईल असे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.