Menu

देश
‘स्ट्रक्चरल ऑडिटरवर खुनाचा गुन्हा दाखल करा’

nobanner

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पूल कोसळून दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला तर ३७ जण जखमी झाले आहेत. या पुलाचा सिमेंटचा संपूर्ण स्लॅबच खाली कोसळल्याने ही दुर्घटना सायंकाळी घरी पतरणाऱ्या चाकरमान्यांवर मोठे संकट कोसळले. दरम्यान, या पुलाच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती व्यक्त करण्यात

येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटरवरुन राजकारण रंगत आहे. रेल्वे प्रशासनाने हात झटकले असून मुंबई महापालिकेने रेल्वेकडे बोट दाखवले आहे. मात्र, सीएसएमटी पूल दुर्घटनेवरून काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुंबई पालिका प्रशासन आणि सरकारवर जोरदार हलाबोल केला असून या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पूल कोसळून दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला तर ३७ जण जखमी झाले आहेत. या पुलाचा सिमेंटचा संपूर्ण स्लॅबच खाली कोसळल्याने ही दुर्घटना सायंकाळी घरी पतरणाऱ्या चाकरमान्यांवर मोठे संकट कोसळले. दरम्यान, या पुलाच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटरवरुन राजकारण रंगत आहे. रेल्वे प्रशासनाने हात झटकले असून मुंबई महापालिकेने रेल्वेकडे बोट दाखवले आहे. मात्र, सीएसएमटी पूल दुर्घटनेवरून काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुंबई पालिका प्रशासन आणि सरकारवर जोरदार हलाबोल केला असून या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

ही गंभीर दुर्घटना. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू आहे. मृतकांच्या कुटुंबियांसोबत संवेदना आहेत. घटनेची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल. पूल १९८० ला बांधलेला आहे, याचे गेल्या वर्षी स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. त्यामध्ये काही सुधारणा सुचविले होते. मात्र हे पूल फिट सांगितले गेले होते. त्यामुळे असे असताना जर पूल कोसळत असेल तर ही गंभीर बाब आहे. हे बिलकुल सहन करण्यासारखे नाही. चौकशी केलीच जाईल सोबतच स्ट्रक्चरल ऑडिट बरोबर होते की नाही याची ही चौकशी केली जाईल. ते जर चुकीचे झाले असेल तर त्यांच्यावर ही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंत्र फडणवीस यांनी दिला. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ज्या सुधारणा सांगितल्या होत्या त्या झाल्या आहेत की नाही हे तपासले जाईल. गेल्या वर्षी मुंबई महापालिका आणि रेल्वे ने सर्व पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये मदत तर जखमींना ५० हजार रुपये मदत आणि त्यांचे उपचार मोफत केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.