Menu

खेल
स्मिथच्या पुनरागमनाकडे लक्ष!

nobanner

चेंडूत फेरफार केल्याप्रकरणी एका वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ राजस्थान रॉयल्स संघातून पुनरागमन करत असल्याने त्याच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात डेव्हिड वॉर्नरने दमदार खेळी साकारत पुनरागमन केल्याने स्मिथही त्याचीच पुनरावृत्ती करणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपूर्वी लयीत परतण्यासाठी स्मिथकरिता यंदाची आयपीएल अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे वॉर्नरप्रमाणेच तडाखेबंद खेळी करून पुनरागमन करण्यास तो उत्सुक असेल. बंदीनंतर स्मिथ बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळला होता. मात्र कोपराला दुखापत झाल्याने त्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरले होते. आता शस्त्रक्रियेनंतर सज्ज झालेल्या स्मिथसमोर पुन्हा लयीत परतण्याचे आव्हान असणार आहे.

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आणि जोस बटलर ही राजस्थानची बलस्थाने आहेत. मात्र ते २५ एप्रिलनंतर मायदेशी परतणार आहे. त्याआधीच त्यांचा उत्तम वापर करून बाद फेरी गाठण्यासाठी भक्कम पायाभरणी करण्याचे ध्येय राजस्थानला साध्य करून घ्यावे लागणार आहे. स्टोक्स हा फलंदाजी आणि गोलंदाजीत राजस्थानचा मौल्यवान खेळाडू ठरू शकतो.

पंजाबला अष्टपैलू सॅम कुरन याच्याकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा आहे. पंजाबकडे मोहम्मद शमी, अ‍ॅण्ड्रय़ू टाय, मुजीब उर रहमान, जयदेव उनाडकट, वरुण आरोन, धवल कुलकर्णी, जोफ्रा आर्चर आणि ईश सोधी हे गोलंदाजीत दमदार पर्याय आहेत. तसेच कर्णधार रवीचंद्रन अश्विनचा फिरकी मारा हा पंजाबच्या गोलंदाजीचा कणा राहणार आहे.

राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, अ‍ॅश्टन टर्नर, ईश सोधी, ओशाने थॉमस, लिआम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन, शुभम रांजणे, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुदेसन मिधून, जयदेव उनाडकट, प्रशांत चोप्रा, महिपाल लोमरो, आर्यमन बिर्ला, रियान पराग,मनन वोरा, धवल कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, वरुण आरोन, शशांक सिंग,  राहुल त्रिपाठी

किंग्ज इलेव्हन पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), सॅम कुरन, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, निकोलस पूरन, मोझेस हेण्ड्रिक्स, हार्डस विजोएन, दर्शन नलकांडे, करुण नायर,सर्फराझ खान, अर्शदीप सिंग, अग्निवेश अयाची, हरप्रीत ब्रार,  ख्रिस गेल, मुरुगन अश्विन,अ‍ॅण्ड्रय़ू टाय, लोकेश राहुल, अंकित राजपूत, मनदीप सिंग, सिमरन सिंग, मयांक अग्रवाल,  मुजीब उर रहमान, डेव्हिड मिलर.

सामन्याची वेळ : रात्री ८ वा.