Menu

खेल
धोनी-साक्षीचे विमानतळावरील ‘कूल’ वर्तन, जमिनीवर पसरली पथारी

nobanner

आयपीएलच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंना दरदिवशी एका शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागते. सततच्या प्रवासामुळे आणि अतिक्रिकेटमुळे खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळत नाही. याला चेन्नईचा कर्णधार धोनीही अपवाद नाही. पण धोनीने फावल्या वेळाचा पुरेपुर फायदा घेतला आहे. धोनी आणि साक्षीचे कूल वर्तन मंगळवारच्या सामन्यानंतर विमानतळावर पहायला मिळाले.

बुधवारी कोलकाता विरोधात विजय मिळवल्यानंतर चेन्नईचा संघ राजस्थान रॉयल्सविरोधात मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी चेन्नईचा संघ बुधवारी पहाटेच्या विमानानं राजस्थानसाठी रवाना झाला. अपूरी झोप आणि थकवा दूर करण्यासाठी धोनीने चक्क विमानतळावरच निद्रा घेतली.

विमानतळावर पसरलेल्या पथारीचा फोटो धोनीनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये धोनी जमिनीवर निद्रा घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे धोनीचा कूल अंदाज समोर आला आहे. सोशल मीडियावर धोनीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.दरम्यान, मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सने घरच्या प्रेक्षकांसमोर कोलकाता नाइट रायडर्सवर सात विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.