Menu

अपराध समाचार
पुण्यात अॅसिड हल्ल्यानंतर गोळीबार, एकाला अटक

nobanner

शहरातील सदाशिव पेठेत रात्री उशीरा एका अज्ञाताने अॅसिड हल्ला केला. त्यानंतर त्याने गोळीबार केल्याने एकच धावपळ उडाली आहे. अॅसिड हल्ल्यात एक युवक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर आरोपीने जवळच्या एका इमारतीत प्रवेश केला आणि तो तेथ लपून बसला. दरम्यान, पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. पुण्यातील या थरारक घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. गोळीबारानंतर एकच गर्दी झाली. यामुळे पोलिसांना आरोपीजवळ पोहोचण्यासाठी कसरत करावी लागली.

एकाने दुसऱ्या तरुणावर अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात पीडित तरुण हा जखमी झाला. मात्र, हा हल्ला का केला, याची माहिती मिळू शकलेली नाही. हल्ल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले. पोलिसांनी परिसाला वेढले. यावेळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेतले.

दरम्यान, अॅसिड हल्ल्यानंतर आरोपीने स्वत:वर पिस्तुलने गोळीबार केला आहे. यामध्ये आरोपीसुद्धा जखमी झाल्याचे कळत आहे. या अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले.