Menu

देश
यंदाचा पाऊस समाधानकारक, पण अल-निनोचा धोका कायम; हवामान खात्याचा अंदाज

nobanner

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) सोमवारी नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पहिलावहिला अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा भारतात समाधानकारक पाऊस पडेल. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन नायर यांनी नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, सरासरी ८९ सेमी इतका पाऊस पडण्याची शक्यता ९६ टक्के इतकी आहे. तसेच यंदा भारतात मान्सूनचा पाऊस सर्वदूर पडेल, असाही हवामान खात्याचा कयास आहे. जून ते ऑगस्ट या काळात समप्रमाणात पाऊस पडेल, असेही हवामान खात्याने सांगितले. हवामान खात्याच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हवामान खात्याकडून मान्सूनविषयीचा दुसरा अंदाज व्यक्त करण्यात येईल. त्यावेळी देशात किती पाऊस पडेल, याचा आणखी नेमका अंदाज येईल.