Menu

बेरोजगारांना काम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पंचामृत डेअरी या कंपणीच्या विरोधात पडघे ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी तीव्र आंदोलन छेडण्यात आले

स्थानिक बेरोजगारांना काम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पंचामृत डेअरी या कंपनी विरोधात, पडघे ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह स्थनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु कंपनी व्यवस्थापन आंदोलकांच्या मागण्यांविषयी कुठलाही प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे संतप्त जमावानी कंपनीत घुसून जबरदस्तीने काम बंद करण्यास भाग पाडले. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने नमते घेत येत्या १७ तारखेला चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

व जर 17 तारखेला कुठलीही चर्चा करण्यास पंचामृत डेरी चे व्येवस्थापन आले नाही तर 18 तारखेला पुन्हा आंदोलन करण्यात येईल व कुठलाही कामकाज चालू करून देणार नाही असे
, स्थानिक आमदार, स्थानिक नगरसेवक ,व शिवसेनेच्या पदाधीकारी , व पडघे ग्रामस्थ ह्यांच्या कडून सांगण्यात आले आहे .

रिपोटर गोविंद जोशी awaazindiatvwebnews