Menu

I.R.B.कंपनीला स्थानिक दहा गावांच्या वतीने ताबडतोब रस्ता दुरुस्त करून साईड बनविने तसेच टोल नाक्यावर २४ तास अ‍ॅम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.

कल्याण फाटा ते कळंबोली पर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली आहे, संपूर्ण रस्ता खराब आहे तसेच रस्त्याला साईड पट्टी नाही.,या मार्गाने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्या कारणाने रोज अपघात होत असतात, या सर्व बाबींचा विचार करून रस्त्याची देखभाल करणा-या I.R.B.कंपनीला स्थानिक दहा गावांच्या वतीने ताबडतोब रस्ता दुरुस्त करून साईड बनविने तसेच टोल नाक्यावर २४ तास अ‍ॅम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले..तसेच तळोजा पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधवंत यांनाही यावेळी निवेदन देण्यात आले, कि जर रस्ता सुरक्षेबाबत सोई सुविधा उपलब्ध नाही केल्या तर टोल नाका बंद करण्यात येईल, जेणेकरून कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यामध्ये लक्ष घालावे., त्याच प्रमाणे रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे थांबणाऱ्या अवजड वाहणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी वरिष्ठ वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा तळोजा यांना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष पनवेल तालुक्यातर्फे निवेदन देण्यात आले त्या वेळी स्थानिक दहा गावातील ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते…. News Cover By Govind Joshi ( Awaaz India Tv Web News – Reporter )