खेल

T20 World Cup 2024 स्पर्धेत 20 संघ खेळणार, पहिल्यांदा ‘या’ देशाचा समावेश

नव्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये खेळवल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup-2024) गुरुवारी विसाव्या संघाची एन्ट्री झाली. युगांडा (Uganda) क्रिकेट संघाने पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेत (ICC Tournament) प्रवेश केला आहे. युगांडाच्या संघाने अनुभवी झिम्बाब्वे आणि केनिया संघाला पराभावाचा धक्का दिला. आयसीसी पुरुष टी20 विश्वचषकात सहभागी होणारा युगांडा हा पाचवा आफ्रिकी देश (African Country) ठरला आहे. टी20 विश्वचषक आफ्रिका क्षेत्राच्या क्वालिफाय सामन्यात युगांडाने दमदार कामगिरी केली. युगांडाने सहापैकी तब्बल पाच सामन्यात विजय मिळवला. या कामगिरीमुळे युगांडाने टॉप-2 मध्ये आपली जागा निश्चित केली. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत युगांडा संघाचा पहिलाच प्रवेश आहे.

युगांडाने झिम्बाब्वेवर केली मात
क्लालिफाय स्पर्धेत युगांडाने तंजानियावर मात करत विजयी सुरुवात केली. तंजानियावर तब्बल आठ विकेटने मात केली. त्यानंतर नामिबियाला युगांडाने 6 विकेटनं धुळ चारली. तर तिसऱ्या सामन्यात युगांडाने आयसीसीचा दर्जा असलेल्या झिम्बाब्वेला पाच विकेटने पराभूत केलं आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर नायजेरियाला 9 विकेटने आणि केनियाला 22 धावांनी हरवत विजयी घोडदौड सुरु ठेवली. गुरुवारी रवांडावर 9 विकेट मात करत युगांडाने टी20 विश्वचषकात क्वालीफाय करण्याचा मान पटकावला.

युगांडाबरोबरच नामिबियानेही पुरुष टी20 विश्वचषकात प्रवेश केला आहे. नामिबियाची ही तिसरी वेळ आहे. आफ्रिका क्वालिफायर पॉईेंट टेबलमध्ये नामिबिया 10 पॉईंटस्ह टॉपवर आहे. युगांडाबरोबर नामिबियाने पाच सामने जिंकले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button